LIC Jeevan Labh Plan:
एलआयसीच्या योजनेत दररोज 127 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 26 लाख रुपयांचे रिटर्न्स मिळू शकतात. जाणून घ्या काय आहे ही एलआयसीची जीवन लाभ योजना.
देशातील सर्वात
मोठी विमा
कंपनी असलेल्या एलआयसीने (LIC) अशी एक पॉलिसी
आणली आहे
ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मोठा
फायदा होऊ
शकतो. एलआयसी
आपल्या ग्राहकांसाठी अनेक
विमा पॉलिसी
उपलब्ध करुन
देत असते.
ज्याच्या माध्यमातन ग्राहकांना अनेक
फायदे होतात.
लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India) अर्थात एलआयसी ही देशातील सर्वात
विश्वसार्ह विमा कंपन्यांपैकी एक मानली जाते.
एलआयसीने जीवन
लाभ ही पॉलिसी (LIC
Jeevan Labh Policy) अशा प्रकारे
तयार केली
आहे की ज्याच्या माध्यमातून एखादी
व्यक्ती गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वचजण
यात गुंतवणूक करु
शकतात. (LIC jeevan Labh Plan invest 233 rupees daily you
will get 17 lakh rupees return)
आपल्याला सांगू इच्छितो की, एलआयसीच्या जीवन लाभ योजने अंतर्गत तुम्ही दररोज 127 रुपये गुंतवणूक केल्यास 26 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. म्हणजेच काही वर्षात पॉलिसी धारक श्रीमंत होऊ शकतो. एलआयसीचा हा प्लान सर्व वर्गातील नागरिकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आला आहे. या पॉलिसीचे नाव जीवन लाभ (936) असे आहे. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे. यामुळे या पॉलिसीचा शेअर बाजाराशी कोणताही संबंध नाही. ही मर्यादित प्रीमियम योजना आहे. मुंलांचा विवाह, अभ्यास आणि मालमत्ता खरेदीसाठी कंपनीने ही योजना तयार केली आहे.
जीवन लाभ पॉलिसीची वैशिष्ट्ये
- LIC
जीवन लाभ पॉलिसी नफा आणि सुरक्षा दोन्ही प्रदान करते
- 8 ते 59 वर्षे या वयोगटातील व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकतात. पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांपर्यात पॉलिसीचा कालावधी निवडता येऊ शकतो.
- कमीत कमी 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागेल तर अधिकाधिक रकमेची कोणतीही मर्यादा नाहीये.
- 2 वर्षांपर्यंत प्रीमियम भरल्यानंतर कर्जाची सुविधा उपलब्ध होते.
- प्रीमियमवर कर सवलत मिळते
- पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला पॉलिसीची रक्कम आणि बोनसला लाभ मिळतो.
असं समजलं जातं की, एखाद्या व्यक्तीने वयाच्या 30 व्या वर्षी 25 वर्षांच्या टर्म प्लान आणि 10 लाख रुपयांच्या विम्याचा पर्याय निवडला तर त्याला 16 वर्षांसाठी दररोज रुपये 127 भरावे लागतील. अशा प्रकारे त्या व्यक्तीला एकूण 7,44,879 रुपये भरावे लागतील. तर मॅच्युरिटीच्यावेळी म्हणजेच 55 व्या वर्षी ही रक्कम 26,25,000 रुपये इतकी होईल.
0 Comments