म्युच्युअल फंड व शेअर मार्केट मधून मिळालेल्या नफ्यावर लागणाऱ्या टॅक्स बद्दलची माहिती

सध्याच्या कोरोना साथीच्या काळात शेअर बाजार (Share Market) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचा कल वाढला आहे. अनेक नवीन गुंतवणूकदारांनी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र त्यापैकी अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आणि म्युच्युअल फंडाच्या नफ्यावर कर (Tax) भरावा लागतो याची माहिती नाही. शेअर बाजारातील नफ्याच्या स्वरूपावर म्हणजे तो दीर्घकालीन आहे की अल्प मुदतीतील आहे यावर कर अवलंबून असतो. कोणत्या परिस्थितीत किती कर भरावा लागेल आणि कोणत्या परिस्थितीत कर वाचवता येऊ शकेल, याबाबत ही माहिती.

शेअर बाजार :

१२ महिन्याच्या आतील नफा (Short Term Capital Gain Tax):

आपण १२ महिन्यांच्या आत शेअर्सची विक्री करुन नफा कमावला तर त्या नफ्याला अल्प मुदतीतील भांडवली नफा असे म्हणतात. यावर 15 टक्के कर भरावा लागतो. मात्र शेअर्स विक्रीत तोटा झाल्यास पुढील 8 वर्षे तो तोटा दाखवू शकता.

१२ महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये मिळालेला नफा (Long Term Capital Gain Tax):

१२ महिन्यांपर्यंत शेअर्स ठेवून नंतर ते विकून त्यातून नफा कमावला तर त्याला दीर्घ मुदतीतील भांडवल लाभ असे म्हणतात. यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असेल तरी त्यावर दहा टक्के कर द्यावा लागेल. तोटा झाल्यास तो पुढे चार वर्षे दाखवू शकता. दीर्घ मुदतीतील भांडवल लाभानेच तोट्याची वजावट केली जाऊ शकते, हे लक्षात घ्या.

डेट्रेडिंग: (Day Trading)

शेअर्स (Stocks/Shares) आज विकत घेऊन आजच विकत असाल; त्याची डिलिव्हरी (Delivery) घेत नसाल तर त्यातून मिळणारा नफा हे तुमचे व्यावसायिक उत्पन्न मानले जाते. त्यामुळे तुमच्या एकूण उत्पन्नात ते जोडले जाते आणि प्राप्ती कराच्या स्लॅबनुसार (Income Tax Slab) त्यावर कर आकाराला जातो. यात नुकसान झाले असेल तर ते पुढेदाखवता येते; मात्र फक्त चार वर्षांसाठी. या उत्पन्नातील तोटा फक्त याच उत्पन्नातूनच वजावट केला जाऊ शकतो.

म्युच्युअल फंड:

इक्विटी फंड-

वर्षभराच्या आत इक्विटी म्युच्युअल फंडाच्या (Equity Mutual Fund) (यात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक इक्विटीमध्ये असते) युनिट विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर 15 टक्के अल्प मुदती भांडवली नफा कर आणि 4 टक्के अधिभार (Cess) आकाराला जातो. गुंतवणुकीचा कालावधी एका वर्षापेक्षा जास्त असेल तर 10 टक्के दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर आणि 4 टक्के अधिभार आकाराला जातो. हा नफा एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणताही कर आकाराला जात नाही.

लाभांश वितरण कर  (Dividend Distribution Tax): इक्विटी म्युच्युअल फंडांनी दिलेला लाभांश (Dividend) करमुक्त असतो; परंतु एएमआय 11.648 टक्के दरानं लाभांश वितरण कर (DDT) भरतात.

डेट फंड:

डेटफंडामध्ये (Debt Funds) अल्प-मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी किमान कालावधी 3 वर्षे आहे. गुंतवणूकीला तीन वर्षे पूर्ण होण्याआधी विक्री केल्यास त्यातून झालेल्या नफा गुंतवणूक दाराच्या उत्पन्नात समाविष्ट केला जातो आणि त्यावर प्राप्ती कराच्या (Income Tax) स्लॅबनुसार करआकारला जातो. तीन वर्षांनंतर विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर 20 टक्के कर आकाराला जातो. या फंडातील गुंतवणूकीत तोटा झाल्यास तो तुम्ही 8 वर्षांपर्यंत पुढे दाखवू शकता. कोणत्याही उत्पन्नात त्याचा समावेश करू शकता.

डीडीटी: 

डेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करण्यापूर्वी फंड हाउसेस (Fund Houses) 29.120टक्के दरानं लाभांश वितरण कर (DDT) भरतात.

                                                Download  App 

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहेसर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


 

 

Post a Comment

0 Comments